मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगड्यापाशी गेल्या आठवड्यात दरड कोसळून द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईहून पुण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी जाताना घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली.
यावेळी जिथे दरड कोसळून दुर्घटना घडली तो डोंगर एमएसआरडिसीच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण जाळी लावून सुरक्षित केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. तसेच गरज पडेल तिथे धोकादायक डोंगराचा भाग पाडून तो भाग संरक्षक जाळी टाकून संरक्षित करावा असे निर्देश त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडिसीच्या अधिकाऱ्यांना दिले.