नागालॅंडमधे सुरक्षा दलाच्या गोळीबारात १३ नागरीक ठार : देशभर उद्रेक आणि निषेध
नागालॅंडमधील मोन जिल्ह्या सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झालाय. दहशतवादी संघटनेशी संबध असल्याच्या संशयावरुन हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जातयं. निष्पापांना मारल्यानं नागालॅंडसह देशभरात या दुर्देवी घटनेचा निषेध होत आहे. या घटनेनंतर लोकांचा उद्रेक झाला. सुरक्षा दल आणि स्थानिकांमधे हिंसक चकमकही झाली. या कारवाईत सुरक्षा दलाचे जवान गंभीर जखमी झाल्याचं आसाम रायफल्सनं सांगितलं. एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यूही झाला आहे. या घटनेच्या कोर्ट ऑफ इन्वायरीचे आदेश दिले असून आज संसदेतही या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.
नागालॅंडमधे भाजपचे जिल्हाध्यक्ष न्यावांग कोन्याकी यांनी लष्करावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. ते शनिवारी ता. ४ सध्याकाळी बाहेर जाताना गोळीबार झाला यामधे त्यांच्या एका साथीदाराचा मृत्यू झाला आहे.
सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन त्यांनी तिरु- ओटिंग रस्तावर घात केला. त्यावेळी चुकून गावकऱ्यांना बंडखोर दहशतवादी समजले. माहीतीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी नमुद केलेल्या त्याच रंगाची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता. सैनिकांनी गाडी थांबवायला सांगूनही गाडी थांबली नाही. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार सुरु केला, त्यात १३ लोकांचा मृत्यू झाला.
मृतामधे सर्व नागरीक मजूर असून काम संपवून पिकअपमधून ते घरी जात होते. रात्री उशिरापर्यंत मजूर घरी न पोचल्यामुळं ग्रामस्थांनी शोध सुरु केला. घटनेची माहीती मिळाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलांची वाहनं जाळली. संतप्त जमावाला नियंत्रीत करण्यासाठी सुरक्षा दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. नागालॅंडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ म्हणाले की, मोन के ओटींगमधे नागरीकांच्या हत्या अत्यंत निषेधार्ह घटन आहे. उच्चस्तरीय एसआयटी नेमून या घटनेची चौकशी केली जाईल. कायद्यानुसार सर्वांना न्याय मिळेल. नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.