सांगली जिल्हयातील शिवसेनेची तयारी पूर्ण, घराघरात मशाल पोहचवा उद्धव ठाकरेंच्या सूचना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीचा आज आढावा घेतला. मातोश्री निवासस्थानात ही महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. सांगली जिल्ह्यातील खानापूर ,सांगली आणि मिरज मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला. जिल्हयातील तीनही मतदारसंघ आपण ताकतीने लढण्यासाठी शिवसेनेची मशाल घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
शिवसेना सचिव व माजी खासदार विनायकजी राऊत यांनी देखील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या महत्त्वपूर्ण बैठकीला सांगली शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्यासह सिद्धार्थ जाधव, महादेव मगदूम, शंभूराज काटकर, संजय काटे, विशाल सिंग राजपूत ,विष्णू पाटील ,मयूर घोडके, गणेश लोखंडे ,चंद्रकांत मैगोरे, महादेव हुलवान ,राज लोखंडे, बापूसाहेब मगर ,लखन ठोंबरे, अण्णासाहेब विचारे, रुपेश मोकाशी, विराज बुटाले ,विठ्ठल संकपाळ, सुरेश साखळकर हे पदाधिकारी उपस्थित होते.