नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता हाताने देखील उखडता येत आहे. हाताने डांबरी रस्ता उखडत असल्याने या रस्त्याचा दर्जा उघड झाला आहे. गुत्तेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा बोरगडी गावकऱ्यांनी निषेध केलाय यावर बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्यानी या कामाची लगेचच शहानिशा करून पुढील योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे. नांदेड येथे निकृष्ट रस्त्याची ग्रामस्थांकडून पोलखोल, आता सरकारी अधिकारी करणार या कामाची शहानिशा.