पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं नाव चर्चेत...

Update: 2021-02-11 09:39 GMT

पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या युवतीने रविवारी रात्री पुण्यातील वानवडी भागात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येसंदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात असून तिच्या आत्महत्येमागे महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर मंत्र्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो व्हायरल झाले असून त्यामुळे भाजपने पूजा च्या आत्महत्येमागे सदर मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

मात्र, सदर मृत मुलीचे भाजप च्या नेत्यांसोबत देखील फोटो असल्याचं दिसून येत आहे. मूळची बीड जिल्ह्यातील असलेली पूजा तिच्या मित्रासोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत तिने पार्टी केली आणि त्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून केली जात आहे.. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने पुणे पोलिस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करावी असं निवेदन देखील देण्यात आलंय. परंतु संबंधित मुलीचे भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. या आत्महत्या प्रकरणाचं गुढ अधिकच वाढत गेल्याचं दिसून येत आहे.

Tags:    

Similar News