PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर कमेंटचा पाऊस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावरून पंतप्रधान मोदी यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे.;
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत मिशन स्कुल एक्सलन्स (Mission school of Excellence) या योजनेचे उद्घाटन करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या फोटोवर कमेंट करताना पटेल संजय (sanjay patel) म्हणाले की, हे काय आहे? शाळेत फक्त तीन बेंच आणि वॉलपेपरच्या भींती आणि सरकणारी भींत? कशी असा सवाल करत मोदींचे खोटे शाळा प्रेम असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.
चौधरी राजा चंदेला (Chaudhari raja Chandela) यांनी कमेंट करताना म्हटले आहे की, पाच विद्यार्थ्यांची शाळा अमेरिकेत असते. मात्र भारतात कधीपासून ही योजना सुरु झाली, माहिती नाही.
चिराग वरमोरा (chirag Varamora) यांनी कमेंट करताना म्हटले आहे की, तुम्ही या शाळेचा पत्ता पाठवू शकता का? म्हणजे त्या स्टुडिओचा?असं म्हणत टोला लगावला आहे.
इतकी चांगली शाळा गुजरातमध्ये असेल तर केजरीवाल यांचे दिल्ली मॉडेल फेल आहे. त्यामुळे भाजपने शाळेच्या मुद्द्यावर गुजरात निवडणूक (Gujrat Election) लढवावी,असं मत संदीप कुमार पटेल यांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र सिंग यादव यांनी कमेंट करत म्हटले आहे की, क्लास रूममध्ये एक बाजूची भिंत खूप छोटी आहे. विभागून अभ्यास होतो की नमस्ते ट्रंपसारखं फक्त भिंतींनी कमजोरी झाकली आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट केलेला फोटो आणि त्यावर आलेल्या कमेंट वाचण्यासाठी खाली लिंक जोडत आहे.