यूक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक
युक्रेन-रशिया मध्ये सुरू असलेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित आहेत. तसंच या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.
युक्रेन रशिया युदधाचा भारतावर मोठा आर्थिक परिणाम होणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे.