पंतप्रधान नरेंद्र मोदी (PMO Narendra Modi)अमेरिका (America ) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात न्युयॉर्क (New York) आणि वॉशिंग्टन (Washington) डीसी येथे पंतप्रधान मोदी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे उद्योजक, राजकीय नेते, विचावंत आणि व्यापार, वाणिज्य, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी भेटी घेत आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, एलन मस्क यांच्यासोबतची भेट छान झाली. या भेटीत उर्जेपासून ते अध्यात्मापर्यंत बहुआयामी चर्चा झाली.
अनेकजण आपल्या समस्या या ट्विटरवर मांडत असतात. त्यातील नागरिकांच्या अनेक समस्यांच निवारण होत असतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात ट्विटरवर (Twitter) फेमस आहेत. त्याचे एकूण 89.4M फॉलोवर्स आहेत. आजच्या या भेटी दरम्यान मोदी यांनी एलॉन मस्क यांच्या भेटीच ट्विट केलं आहे.
त्यानंतर एलन मस्क यांनीही ट्विट करून पून्हा भेटू, असं म्हटलं आहे.
मात्र त्यांच्या भेटी दरम्यान पत्रकारांनी मस्क यांना जॅक डॉर्सी Jack Dorsey यांच्या संदर्भात विचारणा केली असता. एलन मस्क यांनी भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अमेरीकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य वेगळ असल्याचं म्हटलं. आम्हाला त्या त्या देशांच्या कायद्याप्रमाणे वागावे लागते, नाही तर त्या देशातील सरकार आमच्यावर बंदी आणेल असही एलन मस्क यांनी म्हटलं आहे.
तर या भेटीनंतर ट्विटरचे सिइओ एलन मस्क यांनीही ट्विट केले आहे. ते त्यांनी मोदींना सन्मानपूर्वक पुन्हा भेटू अशा पध्दतीच ट्विट केलं आहे