आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. मन की बातचा हा ७७ वा कार्यक्रम होता. सध्या देशावरील असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी संवाद साधताना म्हंटल आहे की, या महामारीच्या संकटात भारत अनेक नैसर्गिक आपत्तींचाही धैर्याने सामना करत आहे. कोरोनाच्या या महामारीत अनेकांनी आपल्या जवळच्याना गमावले त्यांच्याप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात', आजचा विषय कोणता?
PM Modi to address nation on Mann Ki Baat today and all the latest news
देशावर सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट आहे. या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर ऑक्सिजनमुळे प्रचंड हाहाकार उडाला होता. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला होता. हे लक्षात घेऊन सरकारने तातडीने पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या. देशातील प्रत्येक राज्यांना ऑक्सिजन पुरवठा वेळेत आणि पुरेसा कसा होईल यासाठी सरकारने प्रयत्न केले. देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यांचे आभार मानले.