Mumbai Plane Crash | मुंबई एअरपोर्टवर विमान कोसळलं; 3 जण गंभीर जखमी

Update: 2023-09-14 13:45 GMT
Mumbai Plane Crash | मुंबई एअरपोर्टवर विमान कोसळलं; 3 जण गंभीर जखमी
  • whatsapp icon

मुंबईतील डोमेस्टिक विमानतळावर अचानक एक खासगी विमान लँडिंग करतांना कोसळलंय. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये ३ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलानं दिलीय.




दरम्यान मुंबई अग्निशमन दल (MFB) आणि विमानतळावरील प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एक लहान खाजगी जेट विमान VTDBL (6 प्रवासी आणि 2 क्रू ऑन बोर्ड) धावपट्टीवरून घसरले आणि त्यानंतर लँडिंग करताना डोमेस्टिक एअरपोर्टवर क्रॅश झाले, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळावर मुंबई अग्निशमन दल, पोलिस, रुग्णवाहिका मदतीसाठी दाखल झाली आहे. दुर्घटनेतील तिन्ही जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Tags:    

Similar News