परमबीर सिंग फरार घोषित, 30 दिवसात हजर झाले नाही तर होणार संपत्ती जप्त

Update: 2021-11-17 13:19 GMT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांना न्यायालयाने आज फरार घोषित केले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेव्हापासून ते गायब आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. जर ते पुढील 30 दिवसात समोर आले नाही तर त्यांच्या मालमत्तेची जप्ती केली जाणार आहे.

सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा आरोप आहे. गोरेगाव पोलिस यावर तपास करत असून तीन वेळा वॉरंट देऊन देखील सिंह हजर झाले नाहीत. म्हणून त्यांच्यासह अन्य दोन आरोपी रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू यांना फरार गुन्हेगार घोषित करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. बईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने आज ही मागणी मान्य करत त्यांना फरार घोषित केले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. या स्फोटक कार प्रकरणामागे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे असल्याची बाब समोर आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली होती.

या बदलीनंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी रुपयांचं खंडणी वसुल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाची चौकशी सध्या ED करत आहे.

Tags:    

Similar News