भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथिल वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 6 महिन्यांपूर्वी धाड टाकून काही कागदपत्रे तपासले होते. यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने काल औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या चेरमन पंकजा मुंडे आहेत.
केंद्रीय जीएसटी आयोगाचे औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वारंवार वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटीशीला प्रत्युत्तर न दिल्याने गेल्या सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्यांनी या कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे हस्तगत केली होती. त्यामध्ये या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस बंदोबस्तात कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे मिळून 19 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याचे समजते.