पंजाबमध्ये भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय, देणार 300 युनिट मोफत वीज
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारला एक महिना पुर्ण झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर पंजाब सरकारने प्रति घर 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. (AAP government completed 1 month);
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारला एक महिना पुर्ण झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर पंजाब सरकारने प्रति घर 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. (AAP government completed 1 month)
प्रत्येक निवडणूकीत विविध पक्षांकडून मतदारांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडला जातो. मात्र सत्ता स्थापनेनंतर आपण केलेल्या घोषणांचा विसर पडतो. त्यापार्श्वभुमीवर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेत प्रत्येक घराला 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. (Bhagvant mann took big decision)
पंजाबमध्ये सर्व प्रस्थापित पक्षांना धक्का देत दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवला. तर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी शपथ घेतली आहे. त्यापार्श्वभुमीवर पंजाबमध्ये भगवंत मान सरकारने 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवारी पंजाब सरकारने प्रति घर 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तर हा निर्णय 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहे. याबाबत पंजाब सरकारने घोषणा केली आहे. (AAP Government give a free electricity)
पंजाबमध्ये मे आणि जून महिन्यात पेरणीचा हंगाम असतो. मात्र शेतकऱ्यांना मे आणि जूनमध्ये वीजेची गरज असताना सरकारने जुलैमध्ये मोफत वीज देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रासह पंजाबमध्येही कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने पंजाब सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पंजाब सरकार पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही दिले होते मोफत वीजेचे आश्वासन
2014 च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्कालिन आघाडी सरकारवर हल्ला चढवत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची मागणी केली होती. मात्र पाच वर्षे सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ शकले नव्हते. (Devendra fadanvis also promised on free electricity)
2019 च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तर सध्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षात असताना शेजारच्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना मोफत वीज देणे शक्य आहे मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल तात्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारला विचारला होता. मात्र आता त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत येऊनही आडीच वर्षात शेतकऱ्यांना मोफत वीज देणे शक्य झाले नाही. (Ajit pawar)
राज्यात ऐन उन्हाळ्यात वीज संकट सामान्य नागरिकांसमोर आ वासून उभे ठाकले आहे. तर त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलाच कलगितुरा रंगला आहे.