पाकिस्तानात मध्यरात्री राजकीय भूकंप, इम्रान खान सरकार कोसळले

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात निर्माण झालेल्या आर्थिक आणि राजकीय संकट निर्माण झाले होते. त्यामुळे या परिस्थितीत पाकिस्तानमधील इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यामुळे राजकीय भुकंप झाला आहे.;

Update: 2022-04-10 04:20 GMT

पाकिस्तानातील (Pakistan) राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली होती. तर दुसरीकडे आर्थिक संकट (Economical Crisis) आ वासून उभे होते. त्यापार्श्वभुमीवर शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानात राजकीय भूकंप घडून आला. त्यामुळे इम्रान खान सरकार कोसळले.

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा पहिला भाग शनिवारी हाय होल्टेज ड्रामाने (High voltage drama in Pakistani parliament) संपला. तर पाकिस्तानी संसदेत शनिवारी मध्यरात्री इम्रान खान यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर (Voting against Imran Khan in parliament) मतदान झाले. त्यामध्ये इम्रान खान यांच्याविरोधात 174 सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव पारित झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे. (No confidence motion)

काय घडलं पाकिस्तानमध्ये?

पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये इम्रान खान यांच्याविरोधात जोरदार संताप होता. त्यातच पाकिस्तानातील विरोधी पक्षनेते शेहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्याविरोधात 8 मार्च 2022 रोजी पाकिस्तानी संसदेत अविश्वास ठराव (No confidence motion against Imran khan) मांडला होता. त्यावर इम्रान खान यांनी हा परकीय शक्तींचा कट असल्याची टीका केली. मात्र तरीही या अविश्वास ठरावावर 3 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार होते. मात्र पाकिस्तानी संसदेचे उपाध्यक्ष कासिम सूरी (Kasim suri) यांनी हा अविश्वास ठरावच फेटाळून लावला.

पाकिस्तानी संसदेचे उपाध्यक्ष कासिम सूरी यांनी अविश्वास ठराव फेटाळून लावल्यानंतर इम्रान खान यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली. तर राष्ट्रपती अल्वी यांनी 342 सदस्यसंख्या असलेली पाकिस्तानची संसदच बरखास्त करण्याची तयारी सुरू केली.

त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court of Pakistan) संसदेचे उपाध्यक्ष कासिम सूरी यांचा निर्णय रद्द ठरवला. त्यामुळे अविश्वास ठरावाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार अखेर शनिवारी मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामासह अविश्वास ठरावावर मतदान झाले. त्यामध्ये 174 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे.

अविश्वास ठराव आणि दिवसभर हायहोल्टेज ड्रामा

पाकिस्तानी संसदेत शनिवारी अविश्वास ठरावावर मतदान पार पडणार होते. त्यामुळे 342 सदस्यसंख्या असलेल्या पाकिस्तानी संसदेत 172 सदस्यांचे बहुमत आवश्यक होते. त्यानुसार शनिवारी सकाळी 10 वाजता अविश्वास ठराव मांडला. त्यानंतर दुपारी 12 वा. मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र या प्रक्रीयेदरम्यान पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष असाद कासर आणि उपाध्यक्ष कासिम सूरी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे संसदेचे अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते अयाज सादिक यांनी संसदेचे हंगामी अध्यक्षपद भुषवले. त्यामुळे शनिवारी दिवसभर पाकिस्तानी संसदेत हाय होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

संसदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही अविश्वास ठरावावर होणाऱ्या मतदानावेळी गैरहजर राहणे पसंद केले. तर त्यानंतर इम्रान खान यांचे समर्थक असलेल्या सभात्याग करत मतदानावर बहिष्कार टाकला. मात्र पाकिस्तानी संसदेत 174 सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान केले. त्यामुळे पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यामुळे इम्रान खान यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे.

पुढील पंतप्रधान कोण? (Who is Next PM of Pakistan)

पाकिस्तानच्या संसदेत शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या हाय होल्टेज ड्रामानंतर इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे पुढील पंतप्रधान कोण अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान विरोधी पक्षाचे नेते आणि इम्रान खान यांच्याविरोधात रान पेटवणारे शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान मुस्लीम लीग गटाचे (Pakistan muslim league) अध्यक्ष शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जातात. त्यानुसार आज दुपारी दोन वाजता पंतप्रधान पदाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांनी या घटनेमागे अमेरीकादी देशांचा हात असल्याचा आरोप केला आहे. तर देशातील विरोधी पक्ष अमेरीकेचे बाहुले बनत आहे, अशी टीका इम्रान खान यांनी केली आहे. मात्र इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे.

Tags:    

Similar News