प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळालेल्या साध्वी प्रज्ञासिंह खेळतायत क्रिकेट

Update: 2021-12-26 06:10 GMT

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोप साध्वी प्रज्ञासिंह ह्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. पण या खटल्यातील सुनावणीसाठी देखील त्या उपस्थित राहत नाहीत. अनेकवेळा त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुनावणीला हजर राहण्यापासून सवलत मिळवली आहे. पण त्या खरंच आजारी आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे कारण म्हणजे सध्या साध्वी प्रज्ञासिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या क्रिकेट खेळताना दिसत आहेत. भोपाळमध्ये एका ग्राऊंडवर त्या क्रिकेट खेळत असल्याचे दिसते आहे. याआधी साध्वी प्रज्ञासिंह ह्या अनेकवेळा कोर्टात किंवा संसदेच्या आवारात व्हिलचेअरवर बसून आल्याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.


पण वैद्यकीय कारणांमुळे जामिनावर बाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये कधी त्या बास्केट बॉल खेळताना दिसत आहेत, तर कधी कबड्डी आणि आता क्रिकेट खेळताना त्या दिसत आहेत. क्रिकेट खेळतानाच्या त्यांच्या या व्हिडिओवरुन त्यांना ट्रोल देखील केले जात आहे. यामध्ये अनेकांनी काही मीम्सही टाकले आहेत.

Tags:    

Similar News