युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
रशिया युक्रेन युध्दाची तीव्रता वाढत आहे. या युध्दात रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक होत युक्रेनमधील शहरांवर बाँबवर्षाव सुरू केला आहे. त्यातच मंगळवारी रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यात खारकीव्ह येथे भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर बाँबवर्षाव सुरू केला आहे. त्यातच युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकीव्ह शहरात रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यात कर्नाटकातील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर युध्दग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने मायदेशी आणण्याबाबत सरकारवर दबाव वाढत आहे. त्यावर सरकारने तातडीने पाऊले उचलून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू केले आहे.
दरम्यान युध्दग्रस्त युक्रेनमधून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार चंदन जिंदाल नावाच्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र चंदन जिंदाल या विद्यार्थ्याचा इस्केमिक स्ट्रोकमुळे झाला आहे. त्याला विनितसिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान चंदन जिंदाल या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर चंदनचा मृतदेह भारतात आणण्याची विनंती चंदनच्या वडिलांना सरकारला केली आहे.
रशिया युक्रेन युध्दाची तीव्रता वाढत असल्याने भारतीय दुतावासाने नवी सूचना जारी करत भारतीय नागरीकांनी तातडीने खारकीव्ह सोडण्याची सूचना दिली आहे. तर सर्व नागरीकांनी खारकीव्ह शहर सोडून पेसोचिन, बेझल्युडोव्हका आणि बाबे वसाहतींमध्ये पोहचावे, असे सरकारने सांगितले आहे.
URGENT ADVISORY TO INDIAN STUDENTS IN KHARKIV.@MEAIndia @PIB_India @DDNational @DDNewslive pic.twitter.com/2dykst5LDB
— India in Ukraine (@IndiainUkraine) March 2, 2022