पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या हाती 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांचा दावा
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद सुरु आहे. या परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या वाट्याला 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.;
स्वित्झर्लंड येथील 'डाव्होस'मध्ये 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या (World Economic Forum) विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.
दावोस येथील परिषदेत महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीचे दर्शन घडवले जाणार आहे. याबरोबरच महाराष्ट्रात उद्योग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सामंजस्य करार करण्यात येत आहेत. त्यातच परिषदेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून महाराष्ट्रात 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर या गुंतवणूकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात 10 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
दावोस येथील परिषदेच्या पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या सामंजस्य करार (MOU) मध्ये Greenko energy Projects Pvt.Ltd १२ हजार कोटींची गुंतवणूक , Berkshire Hathaway Home Services Orenda India १६ हजार कोटींची गुंतवणूक, ICP Investments/ Indus Capital १६ हजार कोटींची गुंतवणूक, Rukhi foods २५० कोटींची गुंतवणूक, Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. १ हजार ६५० कोटींची गुंतवणूक करार करण्यात आल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.