शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावर डोळ्यांचे पारणं फेडणारा भव्यदिव्य सोहळा

Update: 2024-06-06 08:18 GMT

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे. या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातून शिवभक्त या ठिकाणी आले आहेत. रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्ताने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला मुख्य कार्यक्रम पार पडत आहे.

Full View

या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली. तसेच अनेक शाहीरी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण रायगड फुलांनी आणि शिवभक्तांनी सजला आहे. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन पारंपरिक पद्धतीने राज्याभिषेक संपन्न झाला. पोवाडे, शिव कथा इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

या सोहळ्यासाठी १५० पोलीस अधिकारी आणि १६०० कर्मचारी, ४ वाहतूक पोलीस अधिकारी आणि १५९ कर्मचारी, रायगड पोलीस दंगल नियंत्रण पथक, स्थानिक बचाव पथक आणि स्वयंसेवक सेवेला हजर आहेत.

Tags:    

Similar News