येत्या गणेशचतुर्थीला शाडूच्या गणेश मूर्तीला पसंती

Update: 2023-08-14 05:22 GMT

काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणपतीच्या मूर्ती बनवण्याची तयारी जोरदार सुरु आहे. गणेशमूर्ती कार्यशाळेत विविध प्रकारच्या गणेश मुर्ती पाहण्यास आणि खरेदी करण्यास गणेश भक्त गर्दी करत आहेत.

दादर पश्चिम येथील श्री आर्ट या गणेशमूर्ती कार्यशाळेत यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींना अधिक मागणी वाढली असल्याचं मुर्तीकांरांनी सांगितले. त्यामुळे कार्यशाळेत सर्व गणेश मूर्ती या शाडूच्या मातीच्या बनवल्या आहेत. लोकंही शाडूची माती असणाऱ्या गणेश मुर्तीना पसंती देत आहेत. दरवर्षी पेक्षा यंदाचा गणपती हा पर्यावरण पुरक असेल असही भाविकांकडून सांगण्यात येतंय.

Tags:    

Similar News