आरक्षण हा गरिबी हटाओचा कार्यक्रम नाही, लक्ष्मण हाकेंचं खासदार संभाजी भोसलेंना उत्तर

Update: 2021-06-02 14:16 GMT

मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. त्यातच खासदार संभाजी राजे यांनी मराठा समाजातील गरीब वर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे. अशी मागणी केली आहे. या मागणीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 'आरक्षण हा गरीबी हटाओ' कार्यक्रम नाही. तरी सुद्धा केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करत EWS आरक्षण आणलं आहे. त्याचा स्वीकार करावा. ओबीसीमधून जे कोणी राज्यातील नेते आरक्षण मागत आहेत. या सर्वांनी एक बाब समजून घ्यावी. ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण हे त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासल्यापणामुळे मिळाले आहे. व्यवस्थेने ज्यांना हजारो वर्ष नाकारलं आहे. त्यांना हे आरक्षण देण्यात आल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. पाहा काय म्हटलंय हाके यांनी

Full View

Tags:    

Similar News