लसीकरण प्रमाणपत्र आता व्हॉट्स ऍपवर उपलब्ध होणार, केंद्र सरकारची अनोखी योजना.

ज्या नागरिकांचं कोव्हिड-१९ लसीकरण करण्यात आलं आहे त्यांना अगदी काही सेकंदात व्हॉट्सअ‍ॅपपद्वारे लसीकरण प्रमाणपत्र मिळू शकणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Update: 2021-08-09 12:42 GMT

आपल्याला लोकलने प्रवास करायचा आहे. त्यासाठी तुमचं कोव्हिड-१९ लसीकरण पूर्ण झालेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात आपल्याकडे आपलं कोव्हिड-१९ लसीकरण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आतापर्यंत, हे लसीकरण प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अ‍ॅप वरून डाउनलोड करता येत होते. मात्र, आता भारत सरकारने यासंदर्भात व्हॉट्स ऍप बरोबर भागीदारी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या कार्यालयाने रविवारी (८ ऑगस्ट) याबाबत घोषणा केली आहे. "ज्या नागरिकांचं कोव्हिड-१९ लसीकरण करण्यात आलं आहे त्यांना अगदी काही सेकंदात व्हॉट्सअ‍ॅपपद्वारे लसीकरण प्रमाणपत्र मिळू शकणार आहे." अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. त्यामुळे, नागरिकांना हे कोव्हिड-१९ लसीकरण प्रमाणपत्र मिळवणं आणखी सोपं होणार आहे. यासाठी नेमकी काय प्रक्रीया आहे हे जाणुन घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ पाहा.

व्हॉट्सअ‍ॅपवर असं डाऊनलोड करा कोव्हिड-१९ लसीकरण प्रमाणपत्र

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyGov करोना हेल्पडेस्कचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करावा लागेल. हा क्रमांक ९०१३१५१५१५ आहे.

एकदा नंबर सेव्ह झाला की व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून कॉन्टॅक्ट लिस्टमधून जाऊन सर्च करा.

करोना हेल्पडेस्कचा चॅटबॉक्स ओपन करून त्यात डाऊनलोड सर्टिफिकेट असं टाईप करा.

त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी पाठवेल.

ओटीपी तपासा आणि एंटर दाबा.

यानंतर चॅटबॉट तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचं करोना लसीकरण प्रमाणपत्र पाठवेल. ते तुम्ही डाऊनलोड करू शकता.

यासाठी नेमकी काय प्रक्रीया आहे हे जाणुन घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ पाहा.


Full View

Tags:    

Similar News