कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री, कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही - अनिल देशमुख
मुंडेंवर आरोप केलेल्या महिलेने पोलीस एफआयआर दाखल करत नसल्याची तक्रार केली आहे. यावर 'कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री. कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.;
मुंडेंवर आरोप केलेल्या महिलेने आपण एकटी पडली असून पोलीस एफआयआर दाखल करत नसल्याची तक्रार केली आहे. यावर 'कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री. महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल' असे मत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर एकच खळबळ माजली. दरम्यान, आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागताना दिसत आहे. संबंधित महिलेविरोधात अनेकांनी ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. या सर्व प्रकारानंतर मुंडेंवर आरोप केलेल्या महिलेने आपण एकटी पडली असून पोलीस एफआयआर दाखल करत नसल्याची तक्रार केली आहे. या आरोपावर देशमुख यांना विचारलं असता त्यांनी
'कायदेशीर कारवाई सुरु असून तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.' आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल' असं सूचक विधान देशमुख यांनी केलं आहे.