पश्चिम बंगालमध्ये ओवेसींना खातंही उघडता आलं नाही; सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
बिहारमध्ये मिळालेल्या यशानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीने ओवेसींनी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपलं नशीब आजमावले;
मुंबई: बिहारमध्ये मिळालेल्या यशानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपलं नशीब आजमावले, मात्र इथे त्यांना अपयश आले आहे. संपूर्ण निकाल आल्यानंतर ओवेसींना एकही उमेदवार जिंकून आणता आला नाही.
बंगालच्या ७ विधानसभा जागांवर ओवेसी यांनी आपले उमेदवार उभे केले होते.यात इतहारच्या जागेवर मोफाककर इस्लाम, जलांगी जागेवर अलसोकत जामन, सागर्दीघीच्या जागेवर नूरे महबूब आलम, भरतपूर जागेवर सज्जाद हुसैन, मालतीपुर जावेर मौलान मोतिउर रहमान, रतुओ जागेवर सईदुर रहमान आणि आसनसोल उत्तर जागेवर दानिश अजीज मैदानात उतरले होते.मात्र या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे.
बिहार प्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ही ओवेसींनी
मुस्लिमबहुल जागांवर लक्ष केंद्रित केले,परंतु पश्चिम बंगालमधील मुस्लिमांनी ओवेसींपेक्षा ममता बॅनर्जी यांना पसंती दिली. त्यामुळे बंगालमध्ये खाते उघडण्याचे स्वप्नही ओवेसींना पूर्ण करता आले नाही.