बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप पुन्हा संसार थाटणार

बिहारच्या राजकारणात BIHAR POLITICS परत एकदा भूकंप आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उत्तर भारतातील या राज्यात सातत्याने राजकीय आघाड्या बिघाड्या होत आहे. हे ज्या ज्या वेळी घडतं, त्यावेळी एक नाव हमखास चर्चेत असतं आणि ते म्हणजे नितीश कुमार यांचं! राजकीय भूकंपाचे हादरे आणि बिहारचं राजकारण हे आता समीकरण बनलं आहे.

Update: 2024-01-28 06:46 GMT

बिहारच्या राजकारणात BIHAR POLITICS परत एकदा भूकंप आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उत्तर भारतातील या राज्यात सातत्याने राजकीय आघाड्या बिघाड्या होत आहे. हे ज्या ज्या वेळी घडतं, त्यावेळी एक नाव हमखास चर्चेत असतं आणि ते म्हणजे नितीश कुमार यांचं! राजकीय भूकंपाचे हादरे आणि बिहारचं राजकारण हे आता समीकरण बनलं आहे.


बिहारला पुन्हा नवं सरकार मिळणार आहे.

बिहारमध्ये नव्या सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाल आहे. जेडीयूच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर नितीशकुमार NITISHKUMAR यांनी बिहार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. नितीशकुमार आज भाजपसोबत सत्ता स्थापन करून आज शपथविधी घेणार आहेत. नीतीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असून, चार वर्षात बिहारमध्ये चौथ्यांदा नवं सरकार स्थापन होणार आहे. बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. तिथे पुन्हा एकदा सत्ताबदल होण्याचे संकेत पूर्णत्वास जात आहेत. नितीश कुमार आणि एनडीएचं सरकार स्थापन होणार असून आज दुपारी चार वाजता बिहारला पुन्हा नवं सरकार मिळणार आहे.

50 दिवसांत बिहारचे राजकारण बदलले आहे

लालूप्रसाद यादव LALUPRASAD YADAV यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आल्यानंतर नितीश कुमारांनी मरेन पण भाजपसोबत जाणार नाही, असं म्हणत होते. तर अमित शाहांनी AMIT SHAHA जाहीर सभेत सांगितलं की, नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद झालेत. पण, या गोष्टींचा विसर पडण्याआधीच बिहारमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल लागली. नितीश कुमार भूमिका बदलतील असंही कुणालाही वाटलं नव्हतं मात्र आता तसंच घडताना दिसत आहे. अमित शाह आणि नितीश कुमार यांची भेट झाली आणि 50 दिवसांत बिहारचे राजकारण बदलले आहे

बिहार राज्यात चौथ्यांदा मुख्यमंत्री शपथविधी पार पडणार आहे.

बिहारच्या राजकारणात मागील 50 दिवस खूप महत्त्वाचे ठरले आहेत. त्यामुळे येथील राजकारण पूर्णपणे बदलून गेलं आहे. भाजपसोबत जाणार नाही, असं म्हणणारे नितीश कुमार यांनी याक्षणी राजदची साथ सोडून भाजपसोबत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन नवव्यादा मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळतील. थोड्याच वेळात एनडीएची महत्वाची बैठक होणार आहे. त्यात भाजपा नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार आहे. अशात बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप पुन्हा संसार थाटणार असून, बिहार राज्यात चौथ्यांदा मुख्यमंत्री शपथविधी पार पडणार आहे.

Tags:    

Similar News