नितीन गडकरी मोदींकडून कोरोनाच्या लढाईचे सूत्र घेणार का? काय म्हणाले गडकरी?

Update: 2021-05-06 12:03 GMT

आज वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड येथे नितीन गडकरी यांनी भेट देऊन संपूर्ण कंपनीच्या प्रॉडक्शन चा आढावा घेतला. या कंपनीमध्ये दररोज तीस हजार व्हायल रेमेडीसिविर औषधं तयार होणार आहेत. याचं प्रॉडक्शन आज पासून नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरु झालं. महाराष्ट्राला 30 हजार रेमडेसीवीर मिळाल्यानं महाराष्ट्राला दिलासा मिळाला असून याची प्राथमिकता विदर्भाला असेल असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी PMO बिनकामाचे असून कोरोना परिस्थिती हाताळण्याचे काम गडकरींकडे द्या. अशी मागणी केली होती. यावर गडकरी यांना विचारलं असता...

यावर गडकरी म्हणाले...

मी काही उत्कृष्ट काम वगेरे करत नाही आहे. समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान असणारे लोक आहेत. ज्यात आपले पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, कंपाउंडर, डॉक्टर्स, पॅरामेडिकल कोर्सेस आणि सरकारी कर्मचारी आहेत. सध्या जात, पात, पंत, लिंग आणि पक्ष मध्ये ना आणता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि ते येत सुद्धा आहे. सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला आहे.

काय म्हटलं होतं स्वामी यांनी?

"इस्लामिक आणि ब्रिटीश आक्रमणांविरोधात ज्याप्रमाणे भारताने तोंड दिले तशाच प्रकारे कोरोनाविरोधात भारत लढा देईल. पण आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही तर कोरोनाच्या आणखी एका लाटेची भीती आहे, ज्यामध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या लढ्याची जबाबदारी नितीन गडकरींकडे द्यावी कारण या कामात पंतप्रधान मोदींचे कार्यालय बिनकामाचे ठरले आहे."

"आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना फ्री हँड द्या"

"याचा अर्थ मोदी सरकारमधील केवळ गडकरी हे एकमेव सक्षम मंत्री आहेत, असे आपल्याला म्हणायचे आहे का," असा सवाल एका नेटकऱ्याने स्वामींना विचारला. यावर, "तसे नाही डॉ.हर्षवर्धन यांना मोकळेपणाने काम करु दिले गेले नाही, हर्षवर्धन हे प्रामाणिकपणे काम करणारे आहेत, गडकरींच्या नेतृत्वाखाली ते चांगले काम करतील" असे स्वामी यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News