NIA Raid Mumbai : मुंबईत दाऊदशी संबंधीत 20 ठिकाणी छापेमारी, NIA ची मोठी कारवाई

महाराष्ट्रात पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांनी छापेमारीचा वेग वाढवला आहे. तर कुख्यात अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंधीत प्रकरणांमध्ये NIA ने छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे.;

Update: 2022-05-09 05:13 GMT

महाराष्ट्रात पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांनी छापेमारीचा वेग वाढवला आहे. तर कुख्यात अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंधीत प्रकरणांमध्ये NIA ने छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. 

अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंधीत 20 प्रकरणांमध्ये NIA ने मोठी कारवाई केली आहे. तर दाऊदशी संबंधीत असलेले शार्प शुटर्स आणि हवाला ऑपरेटर्स यांच्यावर मुंबईतील विविध ठिकाणी NIA ने छापेमारी केली आहे. यामध्ये नागपाडा, बोरीवली, मुंब्रा, गोरेगाव, सांताक्रुझ आणि भेंडी बाजार या ठिकाणांचा सामावेश आहे. तर यामध्ये हवाला ऑपरेटर्स, ड्रग्ज तस्कर यांच्यासह दाऊदशी संबंधीत असलेल्या लोकांवर छापेमारी करण्यात आली आहे.

आणखी एक मंत्री अडचणीत?

दाऊदशी संबंध असल्याच्या प्रकरणांमध्ये मंत्री नवाब मलिक यांना 23 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. तर मलिक हे सध्या तुरूंगवासात आहेत. तर अशाच प्रकारे दाऊदशी संबंधीत प्रकरणात नवाब मलिक यांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर भाजप नेत्यांकडून आणखी एक मंत्र्याला अटक होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे नवाब मलिका यांच्यापाठोपाठ मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आणखी एका मंत्र्याला अटक होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

Tags:    

Similar News