कवडीमोल पैसे देत मराठी माणसाला देशोधडीला लावलं जात आहे - राज ठाकरे
परप्रांतियांकडून मराठी माणसांच्या जमिनी कशा बळकावल्या जाताय यासंदर्भात स्पष्टच भाष्य पत्रकार परिषद घेत केले आहे.बारसूनंतर रायगडच्या जमिनीवर परप्रांतियांचा डोळा असल्याची माहिती राज ठाकरे यांनी उघड केली आहे.;
परप्रांतियांकडून मराठी माणसांच्या जमिनी कशा बळकावल्या जाताय यासंदर्भात स्पष्टच भाष्य पत्रकार परिषद घेत केले आहे.बारसूनंतर रायगडच्या जमिनीवर परप्रांतियांचा डोळा असल्याची माहिती राज ठाकरे यांनी उघड केली आहे.
दलालांपासून सावध रहा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या मूळ स्वभावात आल्याचं कल दिसलं आहे. रायगडच्या धरतीवर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, ज्यात अनेक मुद्द्यांवर त्यांनी त्यांच्या मूळ स्टाईल मध्ये येऊन पुन्हा एकदा पर प्रांतियांवर हल्ला चढवला आहे. मोर्चा पुन्हा एकदा परप्रातियांकडे वळवला आहे. तर बारसूनंतर रायगडच्या जमिनीवर परप्रांतियांचा डोळा असून मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं काम सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलंय.
थोडक्यात परप्रांतियांकडून मराठी माणसांच्या जमिनी कशा बळकावल्या जाताय यासंदर्भात स्पष्ट स्वरूपाचं भाष्य पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मोठाले सरकारी प्रोजेक्ट पाहून स्थानिकांकडून परप्रांतिय जमिनी खरेदी करत आहेत. कवडीमोल पैसे देत मराठी माणसाला देशोधडीला लावलं जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलंय. अलिबागमध्ये जमिन परिषद घेऊन राज ठाकरे यांनी जमिनीचे व्यवहार काळजीपूर्वक करण्याचा सल्ला देउन, दलालांपासून सावध राहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मराठी माणसांना केलं आहे.