सरपंचाला मारहाण केल्याप्रकरणी डीपीआयचा निषेध मोर्चा

Update: 2023-12-01 04:36 GMT

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात असणाऱ्या जुळेवाडी या गावातील सरपंच नितीन राजेंद्र आवळे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तासगाव तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. नितीन राजेंद्र आवळे हे सरपंच झाल्यापासून गावातील काही लोकांकडून त्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भर ग्रामसभेत वादावादी करत आरोपी उपसरपंच विजय आप्पा खोत व त्याच्या साथीदारांनी सरपंच व त्यांच्या पत्नीला ग्रामपंचायतीतच मारहाण केल्यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यात यावी,सरपंचांना पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डीपीआय चे नेते संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वात हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.




 


Similar News