पत्रकार संरक्षण कायद्यातील त्रुटीवर नीलम गोऱ्हे यांनी ठेवलं बोट
रत्नागिरीचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूप्रकरणी पत्रकार चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच नीलम गोऱ्हे यांनी या कायद्यातील त्रुटींवरच बोट ठेवलं आहे.;
रिफायनरीचे समर्थन करणारे पंढरीनाथ आंबेरकर (Refinary) यांच्याविरोधात बातमी दिल्याच्या दिवशीच पत्रकार शशिकांत वारिशे (Shashikant Warishe) यांचा संशयास्पदरित्या अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी राज्यभरातील पत्रकार चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच आंबेरकर यांच्यावर भारतीय दंड विधान 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पत्रकार संरक्षण कायद्यातील (Journalist Protection Act) त्रुटीवर बोट ठेवलं.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आपल्याकडे बहुतांश पोलिस हे चांगलं काम करत आहे. त्यामुळे पोलिसांबद्दल आपण निरपेक्ष बोललं पाहिजे. परंतू एक गोष्ट तितकीच खरी आहे. आपल्याकडे पत्रकार संरक्षण कायदा आहे. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. पत्रकारांवर बऱ्याच वेळा दबाव आणला जातो. हल्ले होतात. त्यामुळे पत्रकारांसाठी स्वतंत्र पोलिस अधिकारी आणि यंत्रणा नेमायला हवी, असं स्पष्ट मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.