ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अव्वल: जयंत पाटील
राज्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. सोमवारी राज्यभरातल्या ग्रामपंचायतीचे निकाल आले स्पष्ट झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अव्वल ठरली असून काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
१३२९५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादीला ३ हजार २६७ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला २ हजार ४०६ भाजप २ हजार ९४२ आणि काँग्रेसला १ हजार ९८३ जागा मिळाल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याचं पाटील यांन सांगितलं. महाआघाडीने अनेक ठिकाणी एकत्रित मिळून निवडणुका लढवल्या.
महाविकास आघाडीचं यश मोठं आहे. त्या तुलनेत भाजप २० टक्केही नाही, भाजपचं अस्तित्व मर्यादित असल्याचं दिसून आलं आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. पत्रकार अर्णव गोस्वामी यांचे चॅट बाहेर आले आहेत. ही गंभीर बाब आहे. त्यांच्याकडे संरक्षण संबंधातील एवढी माहिती बाहेर येणं हे धक्कादायक आहे.
भाजप या प्रकरणी अर्णव यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असं सांगतानाच टीआरपी घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. त्यावर मी बोलणार नाही. परिस्थिती बदलली की त्यानुषंगाने निर्णय होत असतात, त्यामुळे आत्ताच काही बोलणं योग्य नाही, असं ते म्हणाले