खा. सुनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदासह खजिनदार पदाची जबाबदारी ; शरद पवारांची घोषणा

Update: 2023-06-13 02:46 GMT

दि. १२ जून - राष्ट्रवादी पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय खजिनदार पदी ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'भाकरी फिवण्याचं' वक्तव्य केलं होत. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात अनेक बदल करण्यात आले आहे. पक्षाचं खजिनदार पद हे महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे आता तटकरेंची देखील जबाबदारी वाढली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनिल तटकरे यांची खजिनदार पदी नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राज्यासह देशभरात साजरा करण्यात आला. याचवेळी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची घोषणा केली. शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड (Raigad)लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांची राष्ट्रीय खजिनदार पदी नियुक्ती जाहीर केली आहे. तसे नियुक्तीपत्र खासदार सुनिल तटकरे यांना देण्यात आले आहे.

पक्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळल्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. आणि आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देऊन सुनिल तटकरे यांच्या कामाला शरद पवार यांनी पोचपावती दिली आहे.




 


Tags:    

Similar News