खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार

पुणे-शिरुर दरम्यानच्या दुमजली पुलाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 8 हजार 215 कोटींचा निधी मंजूर केल्याने खा. डॉ अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. याबाबत ट्वीट करून त्यांनी माहीती दिली

Update: 2021-07-28 08:26 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. 67 कि.मी अंतराच्या पुणे-शिरुर दरम्यानच्या दुमजली पुलाचा एलिव्हेटेड कॉरीडॉर व चाकण-शिक्रापूर चौपदरीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शिरुर शहरातील अहमदनगर-पुणे रस्त्याची वाहतूक कोंडी फुटणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याने खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी गडकरींची भेट घेऊन आभार मानलेत. याबाबत खासदार कोल्हे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.

डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. केंद्र सरकारने पुणे शिरुर रस्त्यावर दुमजली फ्लायओव्हर व तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता चौपदरीकरण यासाठी एकूण 8 हजार 215 कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल त्यांचे शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आभार मानले".असं ट्वीट खा. कोल्हे यांनी केले आहे.

सोबतच खा. कोल्हे यांनी म्हटलं आहे की , या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विधानसभा मतदारसंघाचे आ. दिलीपराव मोहीते पाटील व शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे आ.अॅड.अशोकबापू पवार यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे.

67 कि.मी अंतराच्या या दुमजली रस्त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनच्या पुणे- नगर रस्त्याची वाहतुक कोंडी फुटणार असल्याने शिरूर तालुक्यातील नागरिकांनी देखील शासनाचे आभार मानले आहेत.

Tags:    

Similar News