राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ब्राम्हण महासंघाच्या आंदोलकांसाठी घेऊन गेल्या केळी आणि बुके
मी त्यांच्या स्वागतासाठी बुके आणला होता. तसंच उपवास असल्याने केळी घेऊन आली होती. पण ते केळी न घेताच निघून गेले
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार (Ncp)अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण महासंघाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं होतं.त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि ब्राम्हण महासंघाचे आंदोलक यामध्ये तणाव निर्माण झाला.त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील(Rupali thombare patil) येथे पोहचल्या होत्या.
आम्ही धक्काबुक्की केली नाही. मी आंदोलन करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या महिला पदाधिकारी आमच्या रोहन नावाच्या पदाधिकाऱ्याच्या अंगावर गेल्या. तुमचं आंदोलन लोकशाही पद्धतीने परिसराच्या बाहेर करा असं आम्ही सांगत होतो. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी बुके आणला होता. तसंच उपवास असल्याने केळी घेऊन आली होती. पण ते केळी न घेताच निघून गेले".
आमचा परिसर सोडून आंदोलन करा एवढंच आमचं म्हणणं होतं. अमोल मिटकरी यांनी धार्मिक भावना दुखावल्या नाहीत. पण आनंद दवेसारख्या लोकांच्या कोणत्या भावना दुखावल्या जात असतील तर त्याला आम्ही काही करु शकत नाही. पण उगाच जातीय तेढ निर्माण केलं जात असून त्यात त्यांना यश मिळणार नाही," असं रुपाली ठोंबरे यावेळी म्हणाल्या.
सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. "एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार", असं मिटकरी म्हणाले होते.