नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार आहे का? राष्ट्रवादीचा मोदीला सवाल

कोरोना विरोधात एकच निती ठरवण्यासाठी बैठक बोलवा, राष्ट्रवादीची मागणी...

Update: 2021-05-10 07:34 GMT

सध्या कोरोनामुळं भारतात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष आता मोदींवर टीका करताना पाहायला मिळत आहे.

'एक देश एक निती' हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही. असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रसरकारला दिला आहे.

उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाहीय तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. ही परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक नीती बनवली नाही तर कोरोना देशातून हद्दपार होणार नाही. अशी भीती व्यक्त करतानाच मोदीसरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि नीती ठरवावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

केंद्रसरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाहीय याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात हायकोर्टाने वेगवेगळे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानेही टास्कफोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. जी कामे केंद्रसरकारला करायची आहेत ती केंद्रसरकारकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतंय असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपशासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करताय तेवढे पैसे कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

Full View

Tags:    

Similar News