#raveparty : मुंबईत क्रुझवर रेव्ह पार्टी, शाहरुख खानचा मुलगा ताब्यात?

Update: 2021-10-03 03:45 GMT

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB ने मुंबईत क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. यामध्ये १० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan ) याचा समावेश आहे, असे वृत्त इंडिया टुडे या वाहिनीने दिले आहे. पण NCB ने आर्यन खान याला अजून अटक केलेली नाही, त्याला या पार्टीमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, अशी देखील माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे NCB सध्या आर्यन खान याची चौकशी करत आहे असेही सांगण्यात येत आहे.

मुंबईहून गोव्याला जात असलेल्या जहाजावर रेव्ह पार्टी सुरू होती. या कारवाईमध्ये एका मोठ्या बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाचाही समावेश असल्याची चर्चा होती, पण तो अभिनेता म्हणजे शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान असल्याचे वृत्त इंडिया टुडे ने दिलेले आहे.

NCB ने शनिवारी टाकलेल्या छाप्यात कोकेन, चरस आणि एमडी यासारखी ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणात १० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या या ग्रुपवर इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित होते अशी माहिती मिळते आहे.

NCBच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. क्रूझवर असलेल्या .लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.

Tags:    

Similar News