#Raveparty : क्रुझ पार्टीमधील त्या दाढीवाल्या व्यक्तीचा व्हिडिओ नवाब मलिक यांनी केला प्रसिद्ध
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ज्या क्रुझवरील पार्टी दरम्यान अटक करण्यात आली होती. त्या पार्टीमध्ये एक दाढीवाला ड्रग माफिया उपस्थित होता, आणि त्यानेच ड्रग्ज पार्टी आयोजित केली होती, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता, त्या दाढीवाल्या व्यक्तीचा एक व्हिडिओ मलिक यांनी ट्विट केला आहे. काशीफ खान याचा त्या क्रुझमधील पार्टी दरम्यान डान्स करतानाचा व्हिडिओ मलिक यांनी ट्विट केला आहे.
Video of Kashif khan dancing on the Cruise ship pic.twitter.com/JoSsYF9Ux1
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 29, 2021
मलिक यांनी त्या दिवशी क्रुझवर जी पार्टी झाली त्या पार्टीमधील संध्याकाळी ६.२६ मिनिटांनी असे लिहिले आहे आणि यात अनेकजण डान्स करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला या क्रूझवर एका व्यक्तीसोबत डान्स करताना दिसत आहे. ही व्यक्ती म्हणजेच क्रूझवर ड्रग्ज पार्टी आयोजित करणाऱ्या आयोजकांपैकी एक असलेला काशिफ खान असल्याचा दावा केला आहे. नवाब मलिक यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदे घेतली, त्यामध्येही काशिफ खान क्रूझवरच होता तर NCBचे समीर वानखेडे यांनी अटक का केली नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
त्या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला एक दाढीवाला पुरूष नाचताना दिसतो आहे. त्याचे नाव काशीफ खान असून रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्या फॅशन टीव्हीचा तो प्रमुख काशिफ खान आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे. एवढेच नाही तर सेक्स रॅकेट, ड्रग्जचा व्यवसाय आणि पॉर्नोग्राफी असे उद्योग काशीफ खान करतो असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
काशिफ खानचे भाजपाच्या अनेक नेत्यांशी संबंध असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. काशीफ खान यानेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या पार्टीचे निमंत्रण दिले होते, असाही दावा मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे यांचे त्याच्याशी चांगेल संबंध आहेत, असाही आरोप मलिक यांनी केला आहे. एवढेच नाही तर काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अनेकदा काशिफ खानशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले पण वानखेडेंनी कारवाई करण्यापासून रोखल्याचे सांगितल्याची दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.