नवाब मलिका यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचे फोटो ट्विट करत म्हणाले...

Update: 2021-10-22 01:49 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिका आणि NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचे दुबईतील हॉटेलमधील फोटो ट्विट केले आहेत. आपण दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखेडे यांनी केला होता. हा दावा खोटा असल्याचं सांगत मलिक यांनी म्हणत थेट समीर वानखेडे यांचे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहे.

यावर आता NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून माझ्या मृत आईवर, रिटायर्ड वडिलांवर आणि बहिणीवर नजर ठेवली जात आहे. माझ्या कुटुंबियांबाबत अपशब्द वापरून वैयक्तिक आरोप केले जात आहे त्याचे मी खंडण करतो. मी माझं काम करतोय, देशाची सेवा आणि ड्रग्सवर कारवाई करतोय यासाठी मला तुरुंगात टाकणार असाल तर मी तयार आहे असं वानखेडे यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी पोस्ट केलेले फोटो मुंबईतील आहेत हवं तर माझा पासपोर्ट डेटा चेक करा. दुबईचे आरोप चुकीचे असून , मी दुबईला कधीच गेलो नाही. मी मालदीवला गेलो होतो, डिपार्टमेंटची अधिकृत परवानगी घेऊनच मी गेलो होतो. मी माझ्या कुटुंबासोबत लहान मुलांसोबत मालदीव गेलो होतो. त्यामुळे खंडणीचे आरोप चुकीचे आहेत असं वानखेडे यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News