राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्टला मंत्रालयातील ध्वजारोहण कार्यक्रमातील भाषणादरम्यान एक वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गोंधळ उडाला होता.
यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देताना
"बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं"
असं वक्तव्य केलं होतं.
यावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या सर्व प्रकरणानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली…
"मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. त्यांनी समोर उभं राहावं. नोटीस आणि पत्रात यात फरक आहे. ते राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत का आदेश काढायला? कमिशनरांनी वक्तव्य तपासून पाहावं. मी तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. दोन दगड मारून गेले हा पुरुषार्थ नाही. ते जे काय करत आहेत ते करू दे. तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही'
माध्यमांना धमकी…
'माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझी बदनामी करायला घेतली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, आमचंही केंद्रात सरकार आहे. राज्य सरकारची उडी किती लांब जाते ते पाहूया,"