महापालिकेच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त क्रांतीकारकांना अभिवादन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले यावेळी शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.;

Update: 2021-08-09 15:21 GMT

 परकीय सत्तेपासून भारत देश स्वतंत्र झाला त्याचे श्रेय क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतमातेवर अपार प्रेम करणा-या देशभक्तांना आहे अशा भावना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केल्या.

क्रांतीदिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी असलेल्या क्रांतीकारकांच्या पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. तर चिंचवडगाव येथील क्रांतीवीर हुतात्मा दामोदर हरी चापेकर आणि त्यांच्या बंधूच्या समूह शिल्पास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.तसेच चिंचवड स्टेशन येथील क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप उपस्थित होते.

Tags:    

Similar News