Mumbai Monsoon | मुंबईच्या काही भागात ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता
mumbai rains orange alert 2023
सोमवारी रात्री वांद्रे, दहिसर,चेंबूर,फोर्ट, माटुंगा, भायखळा यांसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.
IMD ने मुंबई आणि लगतच्या भागात १९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात २० जुलैला हवामान विभागाने इशारा दिला आहे, तर रायगड २१ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालघरसाठी मंगळवारसाठी ‘येलो’ अलर्ट जारी करण्यात आला होता आणि मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) बुधवार आणि गुरुवारी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. आरएमसीने सांगितले की पुढील दोन दिवस जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच पाश्वभूमीवर पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी लोकांना घरातच राहण्याचे आणि नद्या, इतर जलकुंभांमध्ये जाऊ नये असे आवाहन केले आहे.