परमबीर सिंह यांचा आता 'याचिका' बॉम्ब: सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवरही अनेक गंभीर आरोपांचा लेटर बॉम्ब टाकल्या नंतर महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या वादळात सिंह यांनी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात 130 पानांची याचिका दाखल करत मी केलेल्या आरोपांच्या चौकशी सीबीआयमार्फत करा अशी मागणी केली आहे.;

Update: 2021-03-22 10:50 GMT

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि पोलिस अधिकारी सचिन वाझेंचा सहभागानंतर परमबीर सिंह यांची मुंबई आयुक्तपदावरुन हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक खुलासे करत गृहमंत्री अनिल देशमुखांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रातून केला आहे. गेली दोन दिवस या पत्रावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप होत असून आता या प्रकरणी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानं या प्रकरणाला पुढचे वळन मिळाले आहे.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील सर्व आरोपांची सखोल चौकशी व्हावी अशी याचिका त्यांनी दाखल केली आहे. ची बदली ही घटनेने दिलेले हक्क आणि कलम १४ आणि २१चा भंग झाल्याचा आक्षेप त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला आहे.

परमबीर सिंह यांनी याचिकेत, "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकदा एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल."

यासंपूर्ण प्रकरणाची संपूर्ण चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली असून महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशीसाठी सरसकट चौकशी करता येणार नाही अशी तरतूद महाराष्ट्र सरकारने केली असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सीबीआय चौकशी करावी, असे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रात दादरा नगर हवेलीची खासदार मोहल डेलकर आत्महत्या प्रकरणात अनिल देशमुख यांनी दबाव टाकल्याचाही उल्लेख केला आहे. परमबीर सिंह यांच्या मते, 22 फेब्रुवारीला जेव्हा मुंबईतील हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांच्या मृतदेहासह सुसाईड नोटही मिळाली. या नोटमध्ये कीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचं डेलकर यांनी म्हटलं आहे. परंतु अनिल देशमुख सातत्याने आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांवर दबाव टाकत होते असं म्हटलं होतं.

Tags:    

Similar News