रायगडात म्युकरमायकोसिस आजाराचा शिरकाव, एकाचा मृत्यू

Update: 2021-05-21 09:54 GMT

कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जग कवेत घेतले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान असताना रायगड जिल्ह्यात आता म्युकर मायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात पनवेल मध्ये दोन तर खोपोली एक असे तीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी एका रुग्णाचा म्युकर मायकोसिस आजाराने मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

म्युकर मायकोसिस आजारामध्ये स्वतःची काळजी घेणे गरजेचे असून घरगुती तयार केलेल्या मास्क पूर्ण ड्राय झाल्यानंतरच वापरा. असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. जिल्ह्यात या आजाराच्या इंजेक्शनच्या साठा जिल्हा रुग्णालय आणि पनवेल महानगरपालिका रुग्णालयात उपलब्ध आहे. असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी

पनवेल दोन तर खोपोलीत एक रुग्ण, तीन पैकी एकाचा मृत्यूकोरोनाचा प्रादुर्भाव हा अजून सुरूच असून रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र, त्यासोबत आता म्युकरमायकोसिस महामारीनेही डोके वर काढले आहे. राज्यात या आजाराचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये दोन आणि खोपोलीत एक असे तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तीन पैकी एका रुग्णाचा शुक्रवारी या आजाराने मृत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिस आजाराच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

स्वतःची स्वच्छता राखण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांना मधुमेह वा इतर गंभीर आजार असणाऱ्यांना म्युकर मायकोसिस आजार जडत आहे. त्यामुळे कोरोना उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मागील आजाराची माहिती डॉक्टरांना देने गरजेचे आहे. जेणे करून औषधोपचार करणे सोपे जाऊ शकते. नागरिकांनी मास्क वापरताना कापडी मास्क वापरत असतील तर ते धुतल्यानंतर पूर्ण ड्राय झाल्यानंतरच वापरायचे आहे.

अन्यथा फंगस इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची स्वच्छता योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केली आहे. या आजाराच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags:    

Similar News