संसद सुरू होऊन 14 दिवस झाले पण पंतप्रधान मोदी काशीतच रमले

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन आता जवळपास 15 दिवस झाले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही ससंदेत हजेरी लावली नाही

Update: 2021-12-19 05:11 GMT

नवी दिल्ली // संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन आता जवळपास 15 दिवस झाले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही ससंदेत हजेरी लावली नाही, यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. तसेच, राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन हे संविधानाच्या कुठल्याही कलमात बसत नसल्याची आठवणही त्यांनी करून दिली. गेल्या 15 दिवसांपासून हे खासदार महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसून आहेत, पण देशाच्या उपराष्ट्रपतींनी त्यांची साधी दखलही घेतली नसल्याचकडेही त्यांनी लक्ष्य वेधले. 

पंतप्रधान मोदींना गंगेने साद घातली म्हणून ते काशीला गेले व तेथेच रमले,पण संसद सुरू होऊन 14 दिवस झाले तरी ते संसदेत फिरकले नाही. याचे कारण म्हणजे संसदेत आज सक्षम विरोधी पक्ष नाही. केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही.असं राऊत म्हणाले गुलाब नबी आझाद हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवृत्त झाले तेव्हा पंतप्रधान मोदी व्याकूळ झाले व रडले, मात्र त्यांच्या जागी आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचे ऐकायचे नाही ही सरकारची भूमिका नको तितक्या हटवादीपणाची आहे. हा वैचारिक क्षुद्रपणा आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

पंतप्रधान मोदी कालपर्यंत ज्या मूल्यांचा स्वतः उद्घोष करीत होते तीच त्यांनी पायदळी तुडवली आहेत. लोकसभेत अजय मिश्रा टेनी या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी विरोधक वेलमध्ये उतरले. अशावेळी सभागृहात पंतप्रधान, गृहमंत्री उत्तर द्यायला हजर नाहीत, असेही राऊत यांनी सांगितले.  

Tags:    

Similar News