प्रधानमंत्र्यांसाठी नव्या राजवाड्याची नाही तर देशातील नागरिकांना दवाखान्याची गरज- राव
संसद भवन केंद्र सरकारकडून उध्वस्त करण्याचा कटकारस्थान करण्यात येत असल्याचा आरोप करत सेंट्रल विस्टा विरोधी भारत या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. त्याच बरोबर नवीन बांधण्यात येत असलेल्या संसद भवन या प्रकरणामध्ये जवळपास 23 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार असून हा खर्च देशातील गोरगरीब जनतेच्या विकासासाठी त्याचबरोबर दवाखाने तसेच आणखी उपाययोजनांमध्ये लावण्यात यावा अशी मागणी या संघटनेकडून करण्यात येत आहे.
सेंट्रल विस्टा विरोधी भारत या संघटनेतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने देखील करण्यात आले आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील करण्यात आली.
देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळत नाही, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. असं असताना देशातील नागरिकांच्या पैशावर नको त्या ठिकाणी खर्च केला जाणार असेल तर तो आम्हाला मान्य नाही असं यावेळी कॉम्रेड एल आर राव यांनी म्हटले आहे.