Monsoon Update : राज्यात अतिमुसळधार पाऊस; पुण्यासह4 जिल्ह्यात रेड अलर्ट
आज संपूर्ण राज्यभरात पवसाचा जोर असणार आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार असून अनेक जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यासह पालघर, सातारा आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान यावर रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी माहिती देत म्हणाले की " IMD ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
राज्याच्या चारही जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला आहे
तर काही ठिकाणी मात्र हलका पाऊस असण्याची शक्यता आहे. तर उद्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली