Monsoon rain | मान्सून सक्रिय झाल्याने पावसाळी साहित्यांची मागणी वाढली ; रेनकोट, छत्री च्या दरात वाढ

Update: 2023-06-27 15:15 GMT

गेली एक महिना दडी मारलेला पावसानं आता राज्यभर भरसाची सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून पावसापासून सतत पाऊस पडत असल्याने पाऊसाच्या पाण्यापासून बचाव कण्याकरिता लागणाऱ्या साहित्यांचे भाव वाढले आहे. रेनकोट, छत्री आणि पावसाळी टोपी खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. बाजारपेठेत दाखल झालेले पावसाळी साहित्याचे दर चांगलेच वाढले असून 300 ते 400 रुपयात मिळणाऱ्या रेंकोटची किंमत तब्बल 500 ते 700 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर 100 रुपयांत मिळणारी छत्री 200 ते 250 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच बरोबर पावसाळी टोप्या देखील 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. शाळकरी मुलांसह पालकांनी बाजारपेठेत गर्दी करत पावसाळी साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Full View

Tags:    

Similar News