सोशल मिडीयावर मोदी पुन्हा `घायाळ`
मोठा गाजावाजा करत मोठ्या खंडानंतर देशाला संबोधित करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातून `सर्वांनी काळजी घ्यावी`;
या संदेशाव्यतिरीक्त काहीच हाती पडले नाही. परंतू मोदींना पुन्हा सोशल मिडीयावर घायाळ व्हावे लागले. #BoycottModiBhasan हा मोदींच्या भाषणावर बहिष्काराचा ट्रेंड आताही टॉपवरुन असून युट्युबवर डिसलाईक वाढल्यानंतर भाजपने लाईक- डिसलाईचा पर्यायच काढून घेतल्यानं आज मोदी समर्थकांची मोठी पंचायत झाली.
सोशलमिडीयाच्या आधारे प्रपोगंडा आणि प्रचारात आघाडीवर असलेल्या भाजपाला आज पुन्हा सोशलमिडीयावर नामुष्कीला सामोरे जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजचे सहा वाजेच्या भाषण सुरु होण्याआधीच नेटीझन्सनी युट्युवर डिसलाईकचा मारा केला. मोदींचा सहा वाजता भाषण सुरु झाल्यानंतर डिसलाईकचे प्रमाण वाढतच गेले. अखेल भाजप आयटीसेलनं हतबल होऊन युट्युबवरील या भाषणाचे लाईक- डिसलाईचा पर्यायच काढून घेतले.
#BoycottModiBhasan हा मोदींच्या भाषणावर ट्रेंड ट्विटर आणि फेसबुकवर जोरात सुरु होता. आताच्या घडीलाही #BoycottModiBhasan हा ट्रेड टॉपमधे आहे. लस येत नाही तोवर आपल्याला करोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे. करोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी संवाद साधताना सांगितलं. तेरा मिनिटाच्या भाषणात कोरानोपासून काळजी घेण्याव्यतिरिक्त देशातील बेरोजगारी, अतिवृष्टीचे संकट, अर्थव्यवस्थेची उभारी, सीमेवरील संकट याबाबत मोदींनी अवाक्षर देखील उच्चारले नाही.