राज्यातील वाढत्या वाळू माफीयांमुळे नैसर्गिक संपत्तीच्या हानीबरोबरच गुन्हेगारीकरण वाढल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विधी व न्याय विभागाची चर्चा करुन मोक्का लावण्याची कारवाई केली जाईल असं आश्वासन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील प्रश्नोउत्तराच्या तासात दिली.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु झालेल्या पाच दिवसाच्या अल्पकालीन विधीमंडळ आधिवेशनाची सुरुवात आज झाली.राज्यातील वाढत्या अवैध वाळू उपशाबाबत विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित झाला होता.
या चर्चदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. महसुल मंत्री थोरात यांनी नव्या वाळू धोरणाबरोबरच विधी व न्याय विभागाचे मत घेऊन मोक्का लावण्याची कारवाई करु असं सांगितलं.
तत्पूर्वी अधिवेशनाला सुरुवात होताच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, पेपर फुटीसंदर्भात आणि वीज कनेक्शनसंदर्भात दिलेली नोटीस याबद्दल म्हणणं मांडण्याची संधी आम्हाला मिळाव अशी मगाणी केली . दिवसभराच्या कामकाजात १२ बिलं आहेत, एकीकडे दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आहे त्यातच एकदम १२ बिलं मांडणं आणि त्यावर विचार घेणं योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले. त्यावर अजित पवार यांनी विधेयकं नंतर घेऊ असं सांगत देवेंद्र फडणवीस यांची मागणी मान्य केली.