भोंग्यांच्या वादावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर मनसेने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकारने भोंग्या बाबत नियमावली केली पाहिजे, असे मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच "आम्हीं अल्टिमेटमवर ठाम आहोत, भोंगे नाही उतरले तर हनुमान चालीसा लावूच असा इशारा त्यांनी दिला आहे.