१ मार्चपासून दूध १०० रुपये लिटर?

Update: 2021-02-27 11:36 GMT

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असताना आता १ मार्चपासून दुधाचे दर १०० रुपये लीटर होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे ट्विटवर वर सकाळपासून #1मार्चसेदूध100लीटर हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त किसान मोर्चाने आता इंधनाचे दर वाढल्याने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

तर नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनातून आता दूधाचे दर वाढवून सरकारवर दबाव निर्माण करण्याची रणनीती असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. सरकार जर कायदे मागे घेणार नसेल तर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये दुधाचे दर वाढवण्याचा इशारा देण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पण याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे दुधाचे दर खरंच १०० रुपये प्रतिलिटर होतील का हे १ मार्च रोजी कळू शकणार आहे.

Tags:    

Similar News